Tuesday, 9 December 2014

मन सज्जना!



अशी एका व्यक्तीची कमी..
दुसऱ्या व्यक्तीशी बोलून थोडीच भरते.
व्याकुळता कमी होत नाही..
तडफड कमी होत नाही.
जीवात जीव नाही..आणि 
डोळ्याला डोळा नाही.
प्राणापलीकडे जाऊन जीव लावणं..
म्हणजे शाप असतो..मन सज्जना!

Monday, 8 December 2014

नेमकी जे सुटते
 तेच आपल्याला हवे असते..
Aslelya gostinkade aple
Janivpurvk durlaksh aste.

Thursday, 4 December 2014

थरथरनाऱ्या ओठावरही
नाव तुझेच जपले.
गमले मलाही नाही
देह-भान कसे हरपले.
जितेपणी जगाला,
अस्तित्वही खटकले.
विझताच चिता..'वेड्यास'
वाह वाह करत परतले.

Sunday, 19 October 2014

ज्या दिवशी ऑफिसला खूप उशीर होतो त्याच दिवशी नेमकी बसचा पास संपतो..मग पुन्हा त्याला चार्ज करयाला १०-१५ मिनिटे उशीर झाला कि डोक्यावरचा लाल दिवा लागलेलाच असतो.पण एरव्ही स्वतः चा वेळाही न पाळणारे सहकारी डोळे मोठे करतात..चारदा उशिरा येण्याचे कारण विचारून भंडावून सोडतात.कसं ना? वेळेआधी पोहचलं किंवा वेळेत पोहचलं तर यांना पित्त होतं वाटतं. तेव्हा त्यांना काही घेणं देणं नसतं.खरंय ना?
इति ऑफिसमय नमः
आपल्या नकळत आपल्याल्या भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आयुष्यातल्या बदलात सहभाग असतो ...आठवा बरं...

Sunday, 12 October 2014

समजावण्यास अवघड आहे,
हृदय कुठे कुठे पिळते ते.
आणि त्याहून अवघड आहे,
मग कुठल्या दिशेला वळते ते.

Friday, 3 October 2014

शेवटी कुणाचंही कुणावाचून,
अडून म्हणे राहत नाही.
हि गोष्ट वेगळीये कि,
मग कुणी मागे वळूनही पाहत नाही.

Friday, 12 September 2014

   मना सज्जना!

गर्व आणि स्वाभिमान यांतला
फरक करता आला पाहिजे मना सज्जना.
गर्वास स्वाभिमान आणि
स्वाभिमानास गर्व समजण्याची भूल सातत्याने करतो आपण.
त्यासाठी सारासार विचारशक्तीचा
 तिसरा डोळा उघडा हवा.
नाहीतर एका चुकीनेही हे जग
वेड्यांच्या गणतीत बसवायला कमी करत नाही.

   मना सज्जना!
मनाचा आरसा
दिसतो तसा नसतो फारसा.
तो नितळं हि असतो आणि धूसरहि.
त्यावर रंग कामही असते केलेले.
गिरगीट असते मन,
त्यावर विश्वास ठेवतांना..
ठेचेचीहि तयारी हवी..
आणि शर्यतीत टीकन्याचीही.



Wednesday, 4 June 2014

बाहेती

इयत्ता १ली माझी विशेष लक्षात आहे. कारण माझी शाळा घरापासून चांगलीच दूर होती. चालून चालून चांगलीच दमायची. शाळा चांगली असली तरी त्यापर्यंत जाणारे रस्ते एकाहून एक रहस्यमय होते. दुर्दैवाने मला चालत सोबत कुणी नव्हतं आई-वडील शिक्षक त्यामुळे त्याच वेळेत त्यांचे शाळेचे येणे जाणे.माझ्या शाळेचे नाव 'भारत विद्यालय' होते . हिच्याकडे जाणारे फक्त दोन रस्ते होते. एक म्हणजे शेताचा आणि दुसरा म्हणजे बाहेरून डांबरी रस्ता त्यावर सतत वाहनांची वर्दळ असे.शेताच्या रस्त्यावर शेतकी शाळा लागे आणि नंतर भले मोठे शेत आणि मध्ये रस्ता या रस्त्यावर फारशी गर्दी नसे. आणि कधी उशीर झालाच तर जीव मुठीत घेऊन कसबसं शाळेवर पोहोचणं म्हणजे भयाण कसरत होई. कारणही तसेच होते म्हणजे या रस्त्यावर लहान मुलींना पळवून नेण्याचे अनेक पराक्रम झालेले होते. आणि भरीस भर म्हणून एका शेतकी शाळेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आणि शाळेत शेतात त्याचा आत्मा फिरतो. म्हणून आतल्या रस्त्याने पदभ्रमण करणाऱ्यांनी बाहेरच्या रस्त्यावरुन भ्रमणास सुरवात केली. आता इकडून जायला सुरवात केली तेव्हा वाटलं इथे काही भूत येणार नाही आणि कोणी उचलूनही नेणार नाही. आणि मागे पुढे कुणीतरी अनोळखीही का होईना सोबत असे. साधारण महिना २ म्हणीने झाले असावे तश्या अफवा सुटू लागल्या या रस्त्यावरून जातांना  'बाहेती ' नावाचा बंगला लागे . रग्गड श्रीमंत मारवाडी कुटुंब तिथे राहत होते. एक दिवशी म्हणजे भर दुपारी कुणीतरी तिकडच्या ४-५  जणांचा खुण केला आणि सगळ्यांना ओढून वैगरे आणून अंगणात आणून ठेवलेले. इतकेसे  आठवत नाही आता पण दरोदाच पडलेला होताऽक्ख ऎवज  दरोड्यांनी नेलेला होता. आणि तिथल्या बाईनी म्हणे जखमी अवस्थेत दरोड्यांना मारायचा प्रयत्न केलेला आणि आता सारखा तिचा ओरडण्याचा आवाज या घरातून येतो. आता मात्र चांगलीच उडाली होति. आणि ३-४ दिवस शाळेला दांड्या मारून झाल्या पण आईने समजावूनही हिम्मत होईना.तेव्हा गल्लीत खेळतांना एक मैत्रीण झाली तीही एकून टरकलेली  होती मग दोघी मिळून धाडसाने शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. आणि बाहेती जवळून जातांना जरा लांबूनच जायचे ठरले. हळूहळू आमचा समज झाला ती बाई लहान मुलांना त्रास देत नाही. त्यानंतर सतत १० वर्ष मी याच रस्त्याने गेली कित्याके वर्ष ते घर धूळ खात पडलं होतं. आणि अचानक एक दिवस त्या घराला नवीन रंग दिलेला पाहिला काही दिवसात तिथे कुणीतरी राहायला आले पण बाहेती खुण प्रकरण इतके कोरलेले होते डोक्यात कि रंगरंगोटी आणि गर्दी दिसली तरी सायकल जर दूरच चालवायची बाहेती जवळून अगदी आठवणीने आणि जीव मुठीत धरूनच.. 
एक नवीन आठवण, 
एक नवीन बहाणा, 
जतन करत असतो ,
इथला प्रत्येक शहाणा. 

Tuesday, 27 May 2014

तुला विसरता क्षणी स्मरतो जिथे तू
कशी टाकणार तुज मागे वगैरे?
आपण प्रश्नांपासून पळलो कि,
ते आपल्याला पळवतात. 
नाहीतर नको असलेल्या,
वाटेवर तरी वळवतात.

Tuesday, 8 April 2014


 खोटी असली तरीही
 अंबरी नेते स्तुती  क्षणभर तरी
आणि टाळले कितीही
अंगी मांस चढते कणभर तरी

Tuesday, 11 March 2014

आपल्याकडे परदेश आणि परदेशातल्या लोकांवर टीकाच जास्त होते. अर्थात मीहि त्याला अपवाद नव्हते. खरं तर हि लोकं काही वेगळी नसतात. संस्कृतीचा फरक असल्याने आपल्याला त्यांच्या काही गोष्टी खटकतात. आणि तश्या त्यांना देखील आपल्या गोष्टी खटकतच असतात. हे माझ्या इथल्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यावरून आणि स्वानुभवावरून सांगत आहे . सिडनीत ४ वर्ष्यापुर्वी जेव्हा मी आले तेव्हा खूप भांबावलेली होती . बऱ्याच मेहनतीने आणि घरातल्या बसून कंटाळल्याने मी नौकरी शोधण्याचा निर्णय घेतला आणि मला संधी मिळाली. "The Smith Family" च्या मुख्य शाखेत मुख्य विभागात 'मानव संसाधन प्रशासक 'अर्थात ' Human Resource Administrator 'म्हणून निवड झाली. आनंद होता पण खूप ताण होता . आणि इतक्या मोठ्या संस्थेत काम करण्याचा अर्थात नौकरीचाच हा पहिला अनुभव. घाईघाईत माझ्या सोबतीनेच दोन स्त्रिया..ललना  लिफ्ट मधे आल्या. "Hi! Good Morning !" म्हटल्या. अनोळख्या व्यक्तीने स्मितहास्याने अशी चौकशी करणं माझ्यासाठी नवीन असल्यानी मी भांबावली पण दचकत हे"Gm" केलं. पुढच्याच क्षणी "You are late ?"असं विचारलं मी अजूनही तिच्याकडे विचारात बघतच होते ती पुन्हा म्हटली "Because you look nervous " मी म्हटलं "Yes I guess It's my first day here " तिखट मिरची झोंबावी तशी ती ओरडली,"o oo.. Good luck & have a nice day!" मी आपलं "Thank you " म्हटलं. तशी ती हातातल्या ड ब्ब्याकडे बघून म्हटली," whats in your launch box ?you can exchange with my sandwich ?"मी म्हटलं,"That's spicy veg rice" आणि माझा मजला आला म्हणून मी तिला निरोप दिला डब्बा दिला नाही ;)पण नकळत मनावरचा तन गेला. अनोळख्या शहरात अनोळख्य व्यक्तीकडून मिळालेल्या शुभकामनेने मनाला अर्थातच दिलासा मिळालं . तसं…. आपल्याकडे ओळख नसतांना साधा स्मितहास्य देखील मिळणं अवघड असतं. असा त्या क्षणी मला जाणवलं. आणि खरचं लिफ्ट असो कि साधं रस्त्यावरून आपण वाटसरूला बाजूला होऊन दिलेल्या वाटेला हि लोकं भले दिलसे स्मित हास्याने धन्यवाद देतात किंवा सलग शिंका येतांना रेल्वे मध्ये बाजूला बसलेली व्यक्ती जेव्हा ,"are you ok ?" विचारते किंवा साधं बाळासोबत रेल्वेमध्ये जातांना 'pram ' उचलतांना जेव्हा मदतीचे ४ हात समोर येतात किंवा उभे असतात जागा देतात.तेव्हा अनोळख्या माणुसकीची वेगळीच झलक डोळ्यासमोर येते.

अस्मिता 
आपण देवावर श्रद्धा ठेवतो,
काही ठिकाणी अंधश्रद्धाही म्हणतो .
आणि जिथे तर्क लागत नाही,
तेव्हा त्याला नियती म्हणतो. 

Tuesday, 4 March 2014

वळणानंतर वळण येते
आणि मार्ग लागतात सुटायला .
खूप संयम लागतो नाही ना?
प्रत्येक वाट सहजतेने  वळायला . 

Thursday, 27 February 2014

दैनंदिन जीवनात साधा एक बदल केला तरी किती बदलते न आयुष्य?पण बदल स्वीकारायला आपण कुरबुर करतो मग एक असो कि अनेक नाही का?

आजची कविता

आजपण तिने कागद हाती घेतला टेबलवरच्या पेनाकडे थंड नजर टाकली विचारच्या तंद्रीत बडवून घेतले स्वत:ला खुपसे मतले सुचले खुपसे किस्से आठवले खुपसे खर्डे झाले - मनातच ... मैफिलच जमली जणू काहींनी डोळ्यात पाणी आले काहींनी हसून गाल दुखले काहींचे वाचन झाले काहीना टाळ्या मिळाल्या तिचं समाधान झालं ती उठून जायला निघाली पेन उचलला नाही एकही अक्षर लिहिले नाही कागद कोराच राहिला टेबलवरचा कागद वाऱ्यासोबत कधी उडून गेला तिला कळालेही नाही मनाचा कागद मात्र खच्च भरलेला आजच्या कवितेने तिने आजही कविता लिहिली स्वत:साठी कुठलाही पुरावा मागे न ठेवता !!

Pages