Tuesday, 28 December 2010

आजकाल काही लिहावेसे वाटत नाही...कंटाळवाणे वाटते सगळे...इथले वातावरण कधी चांगले असते तर कधी नुसताच पाऊस..पण निळेशार आकाश बघायला खूप आवडते.आणि घराजवळच्या हिरव्यागार गवतावर तासंतास बसून रहावेसे वाटते...जमत नाही जायला ते वेगळेच...पण खरच तिथले वातावरण फार आल्हाददायक आहे..भारावून जावे कुठल्या पुस्तकाने असे इथे मला मिळत नाहीये...किवा नुसतच चालत राहावं सकाळच्या गार वाऱ्यात....तेही जमेना.असा काहीही न करण्याचा माझा बाणा नव्हता खरं तर...पण माहित नाही का काहीही जमत नाहीये...नाहीतर आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी मी सतत काहीतरी असा वेगळं करत होते आधी...कुणीतरी म्हट्लये...आयुष्यात असा बऱ्याचदा होतं...काहीही उमगत नाही..थोडा काळ...धुकं असतं, थोडा काळ स्वच्छ आभाळ....मना मध्ये माझ्या मात्र स्वच्छ सकाळ...

Wednesday, 6 October 2010

रडावसं वाटतांना हुंदक्यातच राहिलेले अश्रू,

आता त्याचा पूरच येतो झंझावाता सहित

तू जवळ नसूनही मला ते पटत नाही,

आई इतका तुझा मला वेडा भास होतो.

Saturday, 2 October 2010

वो कारवा गुजर गये,

वो शाम गुजर गई.

बदल गई है जिंदगी,

लेकीन कमबक्त चाह वही रहि.

Thursday, 30 September 2010

असंच

अंधारात हात फिरवले कि ते कुणालाही लागत असतात.

म्हणून आपण तसं करत नाही.

अंधारची आस कुणाला असते?उजेडाचे स्वप्न पाहणारयास नक्कीच नसते.

अंधारत शोधूनही सापडत नसतात रस्ते अनोळख्याला.

किती आपण जपून ठेवतो आपल्या सगळ्या अनमोल क्षणांना.

स्वप्न सुद्धा कशी गिरगीटासारखी असतात.पूर्ण झाल्याचे उसासे सोडताच पलटून जातात.

आपल्या नकळ आपल्या सोबत अनेक दुवे असतात.

रस्यावर चालतांना अनके चेहरे दिसतात.

ध्येय असूनही नसल्यासारखे आपण कावरे बावरे होतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो.

कितीतरी स्वप्न मनात घर करून असतात.

काही पूर्ण होतात काही पुन्हा जाऊन बसतात.

आपण स्वप्ने पाहतो कारण त्यांना अर्थ असतो.

वाहत्या पाण्यालाही एक प्रवाह असतो.

आपण पाण्यासारखं वाहत राहायचं असतं अर्थपूर्ण.

आणि मनसोक्त जगायचं अंधाराकडे न जाता..

प्रत्येक क्षण...निखळ,निर्व्याजी,नशिला.

Thursday, 23 September 2010

बघ जमवून आणखी थोडं

तक्रारीचा  सूर तुझा,
आणि माझा त्यावर चिडण्याचा.
कसा शिकशील डाव राजा,
गढूळपणा दूर करण्याचा?



आई म्हणते पक्षासारखं,
वागलं पाहिजे नेहमी.
पंखावरलं पाणी झटकून,
उडलं पाहिजे तुम्ही.


मला ते जमत नाही,
आता ते शिकते आहे.
शिकता शिकता हजारदा..
नकळतच चुकते आहे.


माझं घरच उन्हात,
आणि 'तो' राग माझ्या मनात.
आजवर कमवलेलं मग
जातं काही क्षणात.


नको वाटतातं स्वप्न सारे,
क्षणभर मग सजवलेले
दिसत असते तेव्हा तुलाच मग,
मी विचारात हरवलेले.


बघ जमवून आणखी थोडं,
कदाचित तुलाही जमेल.
सोडवू या हे क्लिष्ट कोडं,
म्हणजे रागही रडेलं. 

मग पहा स्वप्नांवर कसं,
राज्य करू दोघं. 
मान-अपमान आणि रागाचे,
परतवून लाऊन सोंगं.

Wednesday, 22 September 2010

जशी संध्याकाळी,
मी गायले इतके.
भलतेच निघाले धागे,
मग स्वप्न पहिले इतके.


सवयीचे झाले आता,
एकटेपणाचे  हे छळणे.
अश्रू मुठीत झेलून,
हुंदक्यातच सतत हे जळणे.



मी शोधले किनारे जितके,
परतवले तुही मला तितके.
तो धन्य 'पतंग' आहे,
ज्याच्या जळण्याने मन हळहळते.


मी फेरीले पाणी,
त्या आसेवर ज्यास मी झुरते,
हाय तिची इच्छाशक्ती,
तितकीच दमदार मला ती स्फुरते.

पाऊलखुणा

वर्तमानकाळात चालून गेलो,
तरी भूतकाळात जातांना.
आठवतील काही पाऊलखुणा तुला,
आपण मनसोक्त रमतांना.


वेळ कापरासारखी भुर्रकन उडून जाते,
उगाच प्रयास करतो आपण
तिला थांबवतांना.
तरीही स्मरशील तुही कदाचित 
हि एक गोड आठवण 
मी असतांना ...नसतांना.


मी जपणार आहे हेही शिंपण,
म्हणजे सापडेल पुन्हा डोकावतांना.
असे कितीतरी क्षण घालवलेत आपण ,
आत्तापर्यंतचा प्रवास करतांना.

Friday, 10 September 2010

सुखकर्ता दुखहर्ता

                                       वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ
                                        निर्विघ्न करुमेदैव सर्वकार्यषु सर्वदा
 या मंत्राने आपण गणपतीला प्रार्थना करतो...ती यासाठी कि आपण सुरु करीत असलेल्या कामाला कुठलीही अडचण न येत यश मिलो यासाठी.प्रत्येक शुभ कार्याची सुरवात गणपती मंत्राने होते.वर्षानुवर्षे पुजल्या जाणाऱ्या या बाप्पाच्या चतुर्थीला मंगलदायक मानले जाते.सुखाचा करता आणि दुखाचा हर्ता समजल्या जाणाऱ्या बाप्पाचे पोट सगळ्या जगाचे दुख झेलण्यामूळेच  कि काय मोठे असावे.लहानपणी मला गणपती बसने म्हणजे आनंदी आनंद असायचा.त्याचं कारण म्हणजे आई मोदकात ५ पैसे टाकायची.आणि ते ज्याला भेटतील..त्याला बाप्पाचा प्रसाद मिळेल अशी सांगायची...तो मिळवण्याच्या धडपडीत मी जास्तीत जास्त मोदक घेत असे.अर्थातच जास्तीत जास्त वेळा मलाच ते मिळायचे.गेली काही वर्ष ते बंद झालंय आणि आता अश्यकच   आहे.पण ते दिवस फार मजेशीर होते.गणपतीचे हे १० दिवस म्हणजे उत्साहाचा सोहळाच असतो हे नाकारून चालणार नाही.या मंगलदायक सोहळ्याची सुरवात करण्यास मोठा हातभार लावणाऱ्या लोकमान्य  टिळकांस माझे शतश: प्रणाम!
गणपती बाप्पा मोरया!  

Thursday, 9 September 2010

स्वैर

मी जितका जीवनाला जाणायचा प्रयत्न  केला ...तितकंच ते मला गूढ वाटत गेलं.
मनुष्याला गूढ गोष्टीत निसर्गताच ओढ असावी असे वाटते.खरच हे जीवन नावच कोडं म्हणजे...कुठलीतरी न संपणारी ओंळ आणि आपण त्याला पूर्णविराम देण्यासारखच  झालं कि.विचार असे  स्वैर असतात हे मला मी लिहायला लागल्यावर जाणवायला लागलं.मोठमोठ्या महापुरुषांनी आणि संतानी त्याला अतिशय सोप्या पद्धतीने व्यक्त करायचा  प्रयत्न केलाय. पण म्हणून कोणी त्यावर विचार करणं थांबवत का? नाही मला नाही वाटत असं मी ह्या कोड्याला उलगडण्याचे सगळे प्रयत्न करत असते.निसर्गाच्या कुठल्या कुठल्या गोष्टीवरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते.पण काही काळानंतर जाणवते कि हे विचार विकारात बदलत चाललेत ..मग मी पूर्णपणे थांबवते.अर्थात काही काळापर्यंतच..तुम्ही काय करतात?

चारोळी

तो अभिमान फुकाचा असतो

अन स्वाभिमानही फुकाचा असतो.

नात्यात ज्या परस्परांच्या .....

अविश्वास सदैव वसतो.


Sunday, 5 September 2010

झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके..

झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके,
तरीही नाद सुटे ना त्या बेकार अपेक्ष्यांचा.

जाळून राख झाली  कधीच अस्तित्वाची,
तरीही अर्थ लागेना या गूढ जीवनाचा.

मी मलाच केली शिक्षा कित्येकदा,
तरीही सुटता सुटे ना हा गुंता परस्परांचा.

सवाल कसले?मी पाठपुरावाच केला,
तसा आदेशच होता  मला, माझ्याच भावनांचा.

चालली नाव कोठे ?..वल्हे कधीच पडले,
नुरले न गाव माझे अन मागमोस किनाऱ्याचा.

Sunday, 29 August 2010

किनारा पास होके..कश्ती मी जो जाना चाहे उसे कौन रोके?
अपनी तकलीफ को दावत दे के जो बुलाये उसे  कौन रोके?
रोके उसे कि जिसे  सहारा चाहिये सचमुच...
जो खुद हि डूब जाने कि तमन्ना रखे उसे कौन रोके

हमे डूबोके उन्हे कौनसा साहिल मिलेगा?
हमे रुलाके उन्हे कौनसी मेहफिल मिलेगी?
कि सजा देंगे रोशनिसे वो अपना घर?
और मौत का हमारे त्योहार बनेगा?


क्या हिज्र के बाद उन्हे सुकून मिलेगा?
और क्या रात के अंधेरे मी चैन मिलेगा?
जाम दिखेगा और जाम मिलेगा.
पर मेरे हयात का ना नाम मिलेगा

Wednesday, 25 August 2010

आता जरा तुझ्या प्रेमात ......

आता जरा तुझ्या प्रेमात
झुळूक होऊन वाहू दे.
आता जरा या काळाला
धून म्हणून गाऊ दे.


मी नदी दूर वाहणारी..
मला संथ वाहू दे.
डोंगरदऱ्या पार करून ..
दूर दूर जाऊ दे.


आभाळासारखं मोठं होऊन
तुझ्या धुंदीत राहू दे.
मीठीत तुझ्या मनसोक्त
दंग होऊन जाऊ दे.



चंद्र,सूर्य नको मला,
तुझ्या सहवासात राहू दे.
तुझ्यासोबत जीवनाचा..
हा प्रवास पाहू दे.

Wednesday, 18 August 2010

कविता उमलताना ...

कविता सुचण हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.ती सुखद आणि अर्थपूर्ण वाटणं हे जितका महत्वाचं  तितकच ते मांडणही अवघड असते.मला ही दैवी देणगी वाटते.कविता अशीच कुणालाही सुचत नाही.लहानपणी शाळेच्या पुस्तकातल्या कविता समजायला लागल्या तेव्हा कळेना ते इतका सोपं असतं आणि हे भाग्य मलाही लाभेल असं.मोहक ओळी  आणि  अर्थपूर्ण शब्दांनी मला कवितेच आकर्षण वाटायला लागलं.आणि मग मी कवितेच्या प्रेमात पडले समजलेच नाही.आणि मग अश्या ऋतूतच मला पहिली कविता सुचली,जमली,आणि मला परितोषीकही जाहीर झाले.त्यासाठी जाहीर झालेले १०१ रुपये आणि ढाल आमच्या कंजूस शाळेने कधीच दिले नाही.हे एक वेगळंच प्रकरण...पण मला तो सुखद धक्का होता.त्यावेळी मी ८ व्या इयत्तेत होते.त्यांनतर शाळेत मला फारच भाव आला होता.माझी पहिली कविता ही अतिशय विनोदी होती आणि ती 'उंदीरमामा'वर होती.आता ती मला नीटशी आठवत नाही.त्याचा कारणही सांगतेच तुम्हला.पण ती आज जितकी आठवते तितकी अशी होती...

   उंदीरमामा
एक होता उंदीरमामा,
नाव त्याचे रोम्या,रोम्या.
एकदा वाजली त्याला थंडी,
अंगात घातली छोटीशी बंडी.
तेव्हाच तो डॉक्टरांकडे गेला,
नाव त्याचे डॉक्टर मनी.
डोके ठेवून छातीवर,
 ठोके मोजते मनी फार.
........................
.........................
...................
...................
बाहेर येऊन म्हणते कशी,
डॉक्टर गेलेत फिरायला.      
आता यातली बरीच कडवी मला आठवत नाही.त्यानंतर मी बरच लिहायला लागले.पण त्यामुळे माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष्य झाले.त्यामुळे आई मला एकदा चांगलीच रागवली.आणि तिने अभ्यासाकडे पूर्ण लक्ष्य देण्याची सक्त ताकीद दिली.आणि कविता लिहिण बंद करायला लावलं.आणि एके दिवशी संतापात मी कचऱ्यासोबत  कवितेची वही जाळून टाकली.ती या निर्धारणे कि आता पुन्हा मी कधीही लिहिणार नाही.पण ते मला जमला नाही.आणि अडीच वर्ष्यानी मी पुन्हा लिहिणं सुरु केलं.                          
            मात्र आता मी नुसते कविता लिहित बसायचे नाही.सुचलेलं.. जमेल तेव्हा जमेल तितका लिहून ठेव्याला लागले.त्यांनतर मला त्यामुळे सूत्रसंचालन करतांनाही सटासट हवं तेव्हा हवा ते टाकता यायला लागलं.यामुळे मला आयतीच संधी मिळू लागली आणि कौतुकासाहित.हा इतिहास नुसता कवितेचा नाही..तर लेख आणि कथा यांचाही आहे.मी त्यातही यशस्वी झाले.त्यावेळी मी वाचन खूप वाढवलं होतं.एक इथे नमूद करेन कि उत्तम वाचन हे तुमच्या उत्तम लेखनाचं कारण असू शकत अथवा असतच.आणि तुमच्या उत्तम प्रकृतीच आणि विचारांचही.अति अलंकारिक रचना करण मला स्वतःलाकधी आवडल नाही.लिहिणं ही एक गंमत वाटते.आणि अभिमानास्पदही वाटते.कधी कधी बरच काळ सुचत नाही...आणि प्रत्येक  वेळेला चांगलं सुचेलंच असं नाही.पण जमेल तेव्हा मला मी शब्दातून व्यक्त करते.आणि मग ते मला हवं तसं अचूक जमलं म्हणजे मी आनंदाने भरारी घेते.शब्दांसहित,कवितेसाहित ..अर्थासहित..

मनातल्या हजार बाता,
मांडत असते शब्दात जेव्हा,
गगनी घेते उंच भरारी 
एक-एक रचना उमलते तेव्हा.
लिहिण्याचा आस्वाद वेगळा,
अन एक-एक शब्दाचा स्वाद वेगळा.
मी जे लिहिते त्यातही रंगते ..
अन जे वाचते त्यातही.
होऊन तेव्हा रंगपरी मी,
खेळत बसते रंगसोहळा. 
आईने मला नंतर कौतुकाची थापही दिली.आणि न थकता माझा कौतुकही ऐकून घेतलं..परंतु
माझं कौशल्य तिला पारखून घ्यायचा होतं असं जेव्हा तिने सांगितलं...तेव्हा माझ्या  कविता उमलण्याच्या सोहळ्याला खरा बहर आला....तो आजही चालू आहे अविरत...

Tuesday, 20 July 2010

कळले मलाच नाही....

कळले मलाच नाही,
मी गुंतले तुझ्यात केव्हा.

स्वप्नात तुझ्या वेगाने,
मग मन रमले केव्हा?

तू प्याला मद्याचा...
 मी प्राशन केला केव्हा?

अन रसिक होऊन तुला
 गाण्यात गायले केव्हा?

मदमस्त तुझ्या धुंदीत ,
फिरले जग जेव्हा-जेव्हा,

देश्यात आढळले  मजला, मीच..
नक्षत्रांच्या तेव्हा- तेव्हा.

Monday, 19 July 2010

पुन्हा कर तू पसारा दोषांचा...

का तुला मी दोष देऊ?
नशिबालाच मी कोसते.


उमगते  जेव्हा कि.. मी एकटीच...
तेव्हा तारे मग मोजते.


बेधुंद तुझ्या प्रेमात,
ठेच  लागताच मग  बावरते


कुणीच नसते हे व्यक्त कराया,
 मलाच  मग मी सावरते.


बेफिकीर,निडर होऊन तेव्हा, 
निराशेला मग डावलते.


पुन्हा कर तू पसारा दोषांचा,
अन चल पुन्हा-पुन्हा मी आवरते.

Sunday, 18 July 2010

जिद्द आहे मनत अजुनही,
आकाश्याला गवसनी घालण्याची.
तुट्ले नाही मी,
आहे पक्क्या निर्धराची.




उठून पुन्हा-पुन्हा.. पंख जरी कापलेस माझे,
मनी असते सदैव ईच्छा..तरिही.. झेप घेण्याची.
फुकट शब्द बोलत नाही....
ताकद आहे सिद्ध करण्याची....




वाटत  नसले खरे तर..
अजमावून पहा....दिसेलच
फिनिक्स इतकिच ताकद आहे...माझ्यात
स्वप्न खर करायची...
विश्वास या शब्दावर ...
विश्वास रहिला नाही आता जरा..
ज्याने दिलासा दयावा,
तोच छळतोय खरा.

Tuesday, 8 June 2010

तू मला समजणार नाही,
ही शक्यता जास्त वाढते आहे.
माझ्या स्वप्नाचं ख़त,
मी माझ्याच हाताने काढते आहे.

पाऊस..

     पाऊस...पाऊस...पाऊस म्हणजे नुसतीच गंमत एवढाच काय ते आठवतंय.कधी काळे गडगडती ढग तर कधी स्वच्छ  आभाळ...मनाला तजेला देणारं.
        लहानपणी पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी नाहीतर शाळातरी लवकर सुटायची.मग भिजत..भिजत घरापर्यंतचा प्रवास.खूप मजेशीर होते ते दिवस.कुठेही थांबून खेळत बसायचे मैत्रिणींसोबत. चिखल म्हणजे जिवलग मित्र माझा...पावसाळ्यातला.आई बाहेरून ओरडायची.तरीही मी चिखलात खेळायचे...तर कधी मातीची भांडी बनवत बसायचे .भांडी बनवणे     हा माझा आवडता उद्योग होता.
        सायकल आली तेव्हा मात्र मला चिखल नकोसा वाटू लागला.सगळे कपडे खराब व्हायचे चिखला-मातीचे.पावसात बरच वेळ खो-खो खेळल्याचा मात्र मला आजही स्पष्ट आठवतय.शाळेत आम्हला कुणीच तेव्हा रागावलेल नव्हतं.सुट्टीच्या दिवशी तर मुद्दामच पावसात भिजायचे.पायरीवर बसून पाऊस बघत बसायचे.गारा उचलून डब्यात भरून खूप खूप खेळायचे.
       आत्ताच्या पावसात मी प्रत्यक्ष भिजत नाही,खूप खेळत नाही.खिडकीतून मनसोक्त पाहायला मात्र सोडत नाही.प्रत्यक्ष भिजले नाही तरी मनाला तजेला येत असतो.पावसात भिजल्यासारखाच आंनद मात्र येत असतो.त्यातच..भिजतांना दूर मी विचारत निघून जाते.लहानपणीच्या त्या भांड्यांचा आकार अजूनही सुधरवित असते.आत्ता आई ओरडत नाही घरत येण्यासाठी.मीही खिडकीतच थांबते चिखलाची गोष्ट स्मरण्यासाठी.
         चहाचा कप आणि मी पावसाला बऱ्याचदा सोबत असतो.प्रत्येक पावसानंतर मात्र मी मोठी झाल्याचा भास जाणवत असतो.पाऊस मला आवडतो.मात्र ते भास नाही.याची जाणीव झाल्यावर पाय खिडकीजवळून अलगद सरकतो.थोडा वेळ सोफ्यावर बसून अलगद खिडकीकडे वळते.आणि पाऊस जिंकल्यासारखा जोरदार पडत असतो.
तू गेला ज्या दिशेने..
 ती पुन्हा येइल असे नाही वाटत.
डोळ्यात साठले जे पाणी..
 ते पुसुनही नाही आटत.

Sunday, 6 June 2010

भणंग चित्र,भणंग स्वप्न,
अन भणंग माझा स्वप्नांचा राजवाडा,
जो सजवतांना उभारला होता मी..
अपेक्ष्यांचा डोलारा.
आता  माझीच मला समझुन मी घेणार आहे,
आता माझीच मी मला सावरुनही घेणार आहे.
स्व: ताच्या खांद्यावर डोके ठेवता येणार नाही,
तरीही खांद्यावर डोके ठेवल्याचे भास मात्र करून मी घेणार आहे.
उरी वेदनांचा उसासा,उसासा,
पापण्यांना  अश्रूंचा भार हा नकोसा,
नको तेच जेव्हा हे सतत होतेच आहे,
त्याला पर्याय नसतो सहसा आताशा.

Monday, 10 May 2010

जगजीत..

 परवा  जगजीतच्या  कॉन्सर्टला गेलो होतो.जगजीत म्हणजे मनाची शांतता...असा हिशोब आहे माझा.त्याच्या संथ,हळुवार आवाजाने मनही शांत होते.आणि त्यातल्यात्यात एकसे एक गझल त्याने सादर केल्या.त्याचा वादक संघ सुद्धा भन्नाट होता.बासरीवादन खूपच सुंदर होते."कौन केहता ही मुहब्बत कि जुबा नही होती.."या गझलने जोरदार सुरवात केली.....प्रेक्षकांनी भरपूर आस्वाद घेतला.शेवटी तर त्याने थांबवल्यावारही फक्त प्रेक्षकांच्या आग्रहाखातर "आहिस्ता आहिस्ता " हि गझल सादर केली..चेहऱ्यावर कसलेही रागाचे,संतापाचे भाव नाहि.वेळेत संपवावं.   असा आग्रह नाहि.प्रेक्षकांचे आणि स्वतःचे संपूर्ण समाधान करण्यावर त्याचा भर..तो खरचं कलेचा पुजारी वाटला मला.कार्यक्रम संपूच नाहि असा वाटत होत..इतका तो यशस्वी होता...यशस्वी शब्दापेक्ष्याही जास्त यश खर तर त्याला भेटल होत.माझ स्वप्न पूर्ण झाल....सिंगापूर मध्ये ते शक्य झाला.याचा आनंद होताच.मनात समाधानहि होत.शेवटच्या गझलेला तर त्याच्या वादकांनी कमालच केली ...अफाट जुगलबंदी झाली...स्वर्गीय आनंद होता तो...संपूच नये असा वाटणारा,मधुर,अविस्मरणीय..सुखद..  क्षण!

Sunday, 9 May 2010

दिवस ...

दिवस येतात...दिवस जातात.आठवणींचे शिंतोडे मागे मात्र सोडून जातात.घरासमोरच गवत मात्र..डोलात वाढत असतं...वाढणाऱ्या वयाची जाणीव  ते करून देत असत.डोळे उघडून पाहिलं तर सतत काहीतरी बदलत असत.आपण मुद्दाम पाहत नाही  म्हणून आपल्याला ते दिसतहि नाही.ऊन-पाऊस,वादळ-वारा..निसर्ग त्याचे खेळ चालू ठेवतो.आपण मात्र आयुष्याची सांगड घालण्यात  सदैव मग्न असतो..भरपूर प्रवास झाल्यावर अचानक लक्ष्यात येत...अरे..कधी झाल हे सगळ..काल तर आपण तिकडे होतो..काही काळ धक्का लागल्यासारख आपण जरी वागत असलो.तरी पुढच्याच क्षणी भूत आणि भविष्याशी सांगड मात्र घालता असतो.वर्तमानकाळ दुर्लक्षितासारखा बाजूला असला.. तरी रुसत मात्र नाही.कारण तोच  वेषांतर करत असतो...प्रत्येकाच्या मनात डोकावण्यासाठी.. 

Wednesday, 5 May 2010

नातं..

मनामध्ये दरी पडल्या तर त्या भरून काढण फार अवघड असतं.लाकडाच्या फटी भूश्याने भरता येतात.पण मनात पडलेल्या फटी वेळीच भरल्या नाहीत तर त्या हळूहळू दरी बनत जातात.कुणाचं कुणाशी देण-घेण नसत.उरतो तो कोरडेपणा.आजकाल नात्यातला ओलावा सहसा दिसत नाही.दिसतात ती फक्त ओलं.ओलं म्हणजे दुरून डोंगर साजरा यापेक्ष्या वेगळ काही नाही.आहे त्यापेक्ष्या जे  नाहीये ते लपवण अवघड असतं.    नातं फार नाजूक असतं.म्हटलं तर कदाचित कापसापेक्ष्याहि मऊ आणि संवेदनशील असतात ती.त्यांना हळुवार जपण हीही एक कला आहे.बऱ्याचदा.. नात्यांमधे गैरसमजूतींचे शिडकावे होत असतात.त्याला वेळीच कोरडा करावा नाहीतर तो चिघळत जातो.आपण ठरवल तसा तो सोडवता येतो.प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय शोधतो. आणि तो शोधालाच पाहिजे.मला वाटत...

नातं म्हणजे ..
थोड तू समज ..
थोडा मी समजून घेते...
कांदा तू चीर...
फोडणी मी देते.

उगाच भांडलो गड्या.
थोडं समझुन घेऊया का?
का चिडलो?त्यावर..
चर्चा करूया का?

चीडचिडीने  काय होतं?
नुसतच बिपी वाढत...
पाऊस आलाय छान त्यात बेभान
होऊन भिजुयात का?

कुणाला का पाडाव मधे?
आयुष्य आपल्या दोघांच..
जरा..कटुता विसरून
एकमेकांना समजून घेऊया का?

पुन्हा एकदा चहा घेऊ,
मनसोक्त गप्पा मारू...
आठवणींची तार छेडून ..
समुद्रकिनारी जाऊया का?

आता

मी ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हापासून डायरीत लिहायचा बंद केलं.आता पेन कागद कमी  असतात   जवळ...त्याची जागा लॅपटॉपने घेतलीये.फिरून,चक्कर मारून...लिहिण आता बंद झाल.आता लिहिते फक्त तेव्हाच जेव्हा मेल्स चेक करते किंवा लॅपटॉप  जेव्हा सुरू असतो.नाहीतर .... सुचलेलही आता मी लिहित नाही.आता आई  नसते ओरडायला बस झालं म्हणून...आणि मीही लाडात येत नाही.आता वाचन हि  खूप  कमी झालये आणि लिहीनही.  आता पेन कोरडे झालेत आणि शाईहि तशीच आहे दौतीत.पानही तशीच आहेत.डाय्ररी रिक्त आहे.आता लिहायचं म्हणून ग्यॅलरीत बसत नाही.वेळ भेटला तरीही तो लिहायला नेहमीच वापरत नाही.कधीतरी लिहिते थोडाफार चुकल्यासारखं वाटतं म्हणून. आता..आता सारच बदललय मी आणि आयुष्यहि...आता मी जरा मोठी झालेय स्वीकारल आणि नाकारल तरीही...


Tuesday, 4 May 2010

पाटी आणि ५ पैसे...


पाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटले.त्यावेळी खाऊसाठी ५ पैसे खूप होते.ते  मला भेटले ते या अटीवर कि माझा घरचा अभ्यास पूर्ण केल्यावरच मी खाऊ  आणावा.मीही आज्ञाधारक होतेच.होकार देऊन मी माझा अभ्यास पूर्ण करायला घेतला.पण तो करताना पैसे हरवू नये म्हणून मी ते पाटीच्या वरच्या कडेत ढकलले होते.अभ्यास पूर्ण झाल्यावर मला ते सापडलेच नाही.खूप शोधले तरीही.पाटी हलवल्यावर  ते कुठे तरी पडले असावे.मी वरच्या कडेत ढकलले पैसे सगळ्या कडांत शोधले.अगदी मागून-पुढून.पण काही सापडेना.शेवटी हैराण होऊन खेळायलाहि  न जाता मी पुन्हा अभ्यास करायला बसले.ते या आशेवर कि कदाचित ते पैसे कुठल्यातरी कडेने बाहेर येतील.बरेच दिवस उलटले, कित्येक महिने,वर्ष्य गेलीत.ते सापडले नाहीत .त्या नंतर कित्येकदा मला खाऊला पैसे भेटले कितीतरी पटीने जास्त.मी नवीन पाटीही घेतली होती...त्यातही शोधले...हे जाणून  होते कि त्यात सापडणार नाही.आजही पाटी दिसली कि मी त्या पाटीत  माझे ५ पैसे शोधते.अगदी कडा चाचपडून.हे माहित असूनही कि हि पाटी माझी नाही...आणि आता ते सापडणार नाहीत.

Monday, 3 May 2010

हृदयी वेदना अन,
मुखी त्रास कश्याला?
मनी वंचनांचे,
फास कश्याला?
सावर-आवर तूच,
तुजला कारण...
कुणी न जेथे तुझे
तेथे आस कश्याला?


नको हवे तर ..
पाश कश्याला?
स्वाभिमानाची..
लाज कश्याला?
टोचतात जे घास घश्याला
मनी त्याचा हव्यास कश्याला?



मुक्त विहंगावे आकाशी,
ठेवुनी मधुमास गडे,
विसरुनी सारे किंतु-परंतु,
 उमले ओठी तेव्हा,
  हास्य गडे.

Friday, 23 April 2010

हितगुज आठवणीचे....

आठवण!आठवण!
कसलीही,कुणाचीहि,कश्याचीही!
छळत असते खूप!
हि चार अक्षरं छोटी पडतात त्याचा विचार करतांना!
मनात प्रश्नांचा काहूर होतो,शरीराचा तापमान वाढत,
नेहमी दुर्लक्षित असलेल्या शरीराचा श्वासही घाबरतो.
आणि हृदयाची धडधड वाढते,नाहीतर शिथिल तरी होते.
             लहानपणी जिथे खेळलो,बागडलो तिथल्या त्या जागेची,व्यक्तींची,वस्तूंची आठवण मनात आली कि अचानकच मन हळवं होत.निरागसपणा,खट्याळपणा आठवून आपणच आपल्याला हसत असतो.लपंडाव,पळापळी,चीपिचीपी,दगड कि माती,कॅरम,कोकोनट,बुद्धिबळ,असो कि मामाचं पत्र असो अन गोल गोल राणी इत इत पाणी,कच्चा लिंबू पक्का लिंबू असो.सारेच खेळ खेळलेलो आपण जीवनाच्या  खेळात हरणार कि जिंकणार कि तो अर्धवटच सोडणार हे ज्याच्या त्याच्या कर्तुत्वावर किंवा नाशिबावारही ठरतं
नशीब नावाची गोष्ट मला कुणास ठाऊक रुचत नाही.परंतु कित्येकदा विचारांची गाडी  नशिबाच्या स्टेशनावर थांबते,खरं तर मी माझ्या मनगटावर विश्वास ठेवते.हाताच्या रेष्या आणि ज्योतीषीवर नाही.कारण ते आपल्या गोंधळलेल्या प्रश्नांचा  मार्ग दाखवतात.परंतु पूर्ण साथ देत नाहीत.स्वत:च  कर्तुत्व,हातांवर पर्यायाने हाताच्या मनगटावर अवलंबून आहे.यावर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी उजव्या हाताच्या मनगटाला म्हणजे
क्रियाशीलतेच प्रतिनिधित्व  करणाऱ्या हाताला सतत जागृत राहण्यासाठी आणि क्रियाशीलतेसाठीही
 काळा दोरा बांधलाही  आहे.आणि बरचं काही... असो जसं जसं आपण मोठे होतो,तसं तसं आपण  नवीन व्यक्तींना भेटता असतो.कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतर्मनात असतेच.अश्या आणि अनेक व्यक्तीच्या अनुभवांवरून आपण जीवन शिकत असतो.
आपण तरुणाईच्या जल्लोषात आव्हान स्वीकारीत पुढे जात असतो.पडतो,लढतो,जिंकतो,हरतो.तरीही स्वप्नांच्या अन ईछयांच्या पुर्तीसाठी झटत असतो.त्यावेळी-
 कित्येकदा आपल्याला,
आपलाच आभाळ ढगाळलेला वाटतं.
कित्येकदा आपलंच मन,
आपल्याला सुनंसुनं वाटतं.

गुरुवर्य दाखवत असतात ती वाट
तरीही आपल्याला चुकल्यासारखा वाटत.
ध्येयाकडे चालातानाही,
अचानकच भरकटल्यासारख वाटतं.

हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी,
मिळता मिळता निसटून जातात  मुठीतून तेव्हा,
आकांक्षी मनाला खूप खूप,
खचल्यासारख वाटतं.

गैरसमजांचे  रंग जेव्हा,
उडवत असतात आपलेच आपल्यावर ,
तेव्हा मग भावनिक मनाला,
एकट एकट वाटतं.
कित्येकदा.... 
         अश्यावेळी ध्येयाने प्रेरित मनाने,भावनांवर नियंत्रण करून अडथळ्यांचा,खाचखळग्यांचा योग्य अर्थ घेऊन जीवनाच्या सर्वोच्च्य शिखरावर पोहचणे हाच मला मानवी जीवनाचा किंबहुना मानवाचा सर्वश्रेठ गुण वाटतो.   प्रत्येकाला हवं ते हवं तेव्हा मिळू शकत नसत किंवा त्याला योग्य वेळी ओळखण होत नसतं.आयुष्यात प्रत्येकाला हजार संधी येतात.पण संधीच सोनं करण फक्त काहींच जमत.कारण आठवणीच्या सहाय्याने अनुभवांचा ताळमेळ घालून आलेल्या संधीशी स्वत :ला जूळवनहि  फक्त काहींच जमत.आणि त्याचं आयुष्य  सोनेरी होत.अश्या सर्वोच्य स्थान पटकावलेल्या किंवा ध्येय गाठलेल्या किंवा त्याच्या आसपास असलेल्या व्यक्तींनी आठवणी मनसागरच्या  शिंपल्यात कोंडून ठेवलेल्या असतात.आणि त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ ते सुंदर मोतीत करतात. उतारवयाकडे झुकणाऱ्या मानवी मनाना  तर त्यांच्या आठवणी सुखदच असतात.त्यांच्या बोलण्याने,वागण्याने,त्यांच्या अनुभवाने जणू ते सांगत असतात.कि -
लहर जेव्हा येते  आठवणीची,
सुटतात गाठी तेव्हा भूतकाळाच्या.
 क्षणात रमतो बालपणात,
 अन क्षणात यौवनात.
आठवणीच्या कावडश्याने,
फिरून येतो म्हातारपणात.
           तर ह्या आठवणी साध्या नसतात.त्या ज्याच्या त्याच्या भिन्न-भिन्न असतात.जीवनाच्या शेवटापर्यंत टिकणाऱ्या श्वासासारख्याच इतर गोष्टीसारख्याच अमीट असतात.हृदयावर,खोल,कोरीव,सुंदर असतात त्या.अर्थात ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणावरहि अवलंबून असत.आठवणी या अनंत असतात.सदैव,अविरत चालणाऱ्या श्वासासारख्या मनातल्या कप्प्यात.जश्या-
आठवणीच्या गगनाला,
गडे किनारे फार,
कोठे कोठे थांबावे ?
असे प्रश्न हजार.
         खरं तर आठवण हि एक गोड साठवण असते.आठवण चांगली असो कि वाईट असो.प्रत्येकाच्या मनात ती असतेच.तिचा प्रवास जितका लांब तितकाच तिचा विषयही मोठा.'आठवण 'या चार अक्षरांबाबत खूप काही बोलता येण्यासारखा आहे.त्याबाबत खोल,गूढ,विसःल,मधुर,अविस्मरणीय अश्या कितीतरी शब्दांच्या सहाय्याने साठवता येण्यासारखंहि आहे.परंतु आठवणींना अनुभवाची जोड देऊन पर्यायी उत्तर चांगला यावं म्हणूनच मला वाटते-
रम मानवा तू आठवणीतही,
पण वर्तमानातही जगात रहा.
होळी कर तू वाईटाची,
अन चांगलं तेच स्वीकारत राहा.

मधुर आठवणींच्या साथीनं,
दु:खाला फुंकत राहा.
अनुभव आणि जिद्दीने,
स्वप्न तुझे साकारत रहा.

उत्कर्ष्याच्या शिखरावर पोहच,
आणि मानवतेने वागत जा.
आठवणींच्या कल्पतरूला.
हळुवार गडे जपत राहा.

Monday, 12 April 2010

चारोळी!

रस्ते बदलले कि आपोआप,
वळणे बदलत असतात.
ध्येय ठरले एकदा म्हणजे,
आपोआप मार्ग सापडत असतात.

Friday, 9 April 2010

कुणीही थांबत नाही....

पाय  कुणी खेचतये म्हणून,
पळायचं कुणी थांबतं का?
हरलं पुन्हा पुन्हा म्हणून,
लढायचं कुणी थांबत का?
ध्येय दूर असलं तरी,
चालायचं कुणी थांबत का?
स्वप्न तुटले तरी,
बघायचं कुणी थांबत का?

नशीब साथ देत नाही म्हणून,
कुणी मुळूमुळू रडतं का?
आणि कुणाच्या रडण्याने,
नशीब त्याचं त्याचं पळत का?
अडथळयांना  तेव्हद्याच जोमाने ,
टक्कर सगळे देत असतात.
कुणी महान वैगरे नाही,
सगळे तर सारखेच असतात.

टिकून ठेवतो स्वतः वर विश्वास जो,
तोच  विजेता होतो खरा.
नशीब वैगरे काहीही नाही,
मनाचा खेळ असतो सारा.
कधी कधी संधी असूनही,
प्रयत्न नसतो तितका बारा.
संधी आणि प्रय्त्नातच मनुष्य,
तावून-सुलाखून  निघतो खरा.

Sunday, 14 March 2010

आठवणी आणि बालपण या माझ्या दोन आवडत्या गोष्टी.बालपणीच्या आठवणीत मी मनसोक्त रमते.आणि बरेचसे मला आठवतेही.त्या खूप सुखद असतात आणि हास्यास्पदही..............मनाला तजेला देऊन जातात बरच वेळ आठवल्या कि.बालपणच्या आठवणीत अल्लडपणा,रडणं,आणि बऱ्याचदा कोरीव घटना साठवलेल्या असतात.आज इतके  वर्ष पूर्ण होऊनही  त्याच जुन्या गोष्टी आठवल्या कि नव्या भासतात.आत्ताच घडल्यासारख्या......चित्रपटाच्या फितीसारख्या डोळ्यासमोर फिरताये असे भास होतात कित्येकदा....

Thursday, 11 March 2010

हितगुज




आभालाला नसतो किनारा
तसा कर्तुत्वालाही नसतोच तो
आयुष्य हे गनितासमानच भासत,
जस गणित बरोबर सोडावल
तर उत्तरही बरोबर येत...
अनुभव हे खुप काही शिकवतात
ते जीवनमूल्य देतात,
आणि त्यांचा मागोवा घेतच
आपण जगतो..

ध्येयाने प्रेरित पक्ष्याला हव तरी काय?
भरभरून उड़न्यासाठी मोकळ आकाश
जिथे नसतो भेदभाव समाजाचा
नसतात बंधने जाती, पंथ अन धर्माची..

मानवाला हव तरी काय..
दोन शब्द प्रेमाचे,
मायेचे, ओलाव्याचे, धीराचे.
त्यातूनच पार पडला म्हणजे,
उडतो मग आभाळअत स्वच्छंदी
पण कित्येकदा करून घेतो
आपणच किनारा आभालाला
आणि आखतो सीमा
कर्तुत्वाच्याही !!

त्या कर्तुत्वाला न आखता
मनाला आखाव्यात,
भावनेचा पूर पाहून
गेल्यावर
सिंहावलोकन करताना...
मागे पाहिल्यावर मग,
समाधान वाटत..
आयुष्यात खुप काही कमवल्याच.

Wednesday, 10 March 2010

शाप




               ते क्षण तेव्हाचे,
           झेलता मला आले नाही.
             दुःख माझेच होते,
         पण पेलता मला आले नाही.


        साऱ्या गोष्टीचा बाऊ होऊन,
       त्या मला हसून चिडवतात.
        माणूस असून सारे काही,
          करता तुला आले नाही.

     निसर्ग आणि देवही हसतो,
     माझ्या अश्या शांततेवर.
      सारे काही देऊनसुद्धा,
   आनंद लुटता तुला आला नाही.

     उसळतात मग लाटा जेव्हा,
    तरीही मी शांतच असते.
    चंद्र मिश्कील हसून बोलतो,
शाप माझा होता हेही सांगता तुला आले नाही.

चारोळी!

निसर्गाच्या नियमांना,
फार कमी  अपवाद असतात.
अन अपवाद म्हणून खरं तर ,
त्यांनाच फार नियम असतात.

Thursday, 28 January 2010

THE NEXT GOAL!!!


When i was in 3rd year BA,i tried to prove best of mine.People can say now that everyone in that age use to try something and wants to prove something.It may be a right.But i am a bit diffrent in this case.i was totally zero in skills and was busy in routine student life.but always had a feeling that something remains to do.only reading book is not enough for personality developement.
At a day,when i was busy in reading book feels to improve my skill sets.i started participatiing in various activites like anchoring,singing.when i started doing anchoring i was very scare to do it and stand on stage.but my decision was fix.so i made my mind not to sacre and decided to give best performance.i achive it in 2nd performance and got much confidance.after that i never scare doing anchoring.most of time i did'nt followed the script but i controlled my full programme.anchoring beacomes very intresting thing for me that days.Once at NSS camp i did anchoring but i think i need some change.i decided to do experiment.our principles,all my teachers were very happy.even guest was very happy by my starting.but at the end i started my experiment by saying that the guest had given us very imprtant things.and started some some nice point which was very best.but on the side of the page i have seen my another ponits and started saying that all.It contains most of all the points said by the guest.i get that i am going on wrong track.The guest fastly asked me,"r u going to tell all my speech?".I give a smile.and said,"no".and ignoring that page handle it very skillfully.i know what i did and my principle sir also.He was very happy for me.After this incident he always insisted to be a anchor in every function,in every lecture.It may be a turing point.
Days after days gone.i was selected in inter-college competition.and played badmintion match.one match i win and one lose.but i tried.i was told by many friends that guitar is hard to learn.i passed one exam successfully.i started anchoring in orchestra group at outside.after that i was famous student in my college.
Dance was never tried by me before.Now i take turn on it.I started in group dance.and participated in inter-college competition and got atleast 3rd award for it.it was nice day.My garduation days were comes to end so it was the time of gathering.In it a participated anchhoring,one fancy dress and one group dance.It was hard to me to do other things with anchhoring.i did my best in it also.i get prizes.Although it was a hectic day,but a most memorable day of mine.i was very happy.when i got prizes.i was not happy because i got prizes.but ahppy for what i decided i completed it with this much glorrious prizes.i feel very bad why i dind't tried before?In that days i also performed various activites like group leader of the NSS.i got award for that.Teachers and principle were askd me why did'nt shows my sparkle from 1st year of BA?you have varios skills.show it to all." smiled and gave answer,"because i did'nt tried.but i will"
And started thinking what is the next goal?...

Thursday, 21 January 2010

संधीची वाट पाहत बसल कि हुकत असते....

सध्याचे दिवस म्हणजे खूप कंटाळवाणे वाटताये.काहीतरी करायचं आहे.पण नक्की काय हे समझत नाहीये.सध्या सगळेच छंद दुर्लक्षित आहेत.वाचनाला तर पार विसरून गेले आहे मी.पुस्तक जवळ असूनही वाचन होत नाहीये.सगळे कौशल्य पणाला लावून काहीतरी सिद्ध करायचं हे मात्र डोक्यात पक्कं आहे.नवीन वर्ष्याची नियमावली तर खूप मोठी आहे.खर तर मी माझी स्वप्ने लवकरच पूर्ण करेल यावर माझा प्रचंड विश्वास आहे पण कदाचित योग्य वेळेची गरज आहे.परवाच एका सेमिनार गेली होती.सेमिनार व्यवसाय व्यवस्थापनावर आहे अस मला सांगितलेले होते.पण तो खूप कंटाळवाणा होता.परंतु शेवट खूप छान गोष्टीने झाला .गोष्ट अशी होती कि एकदा एका शेतकऱ्याची मुलगी एका मुलाला खूप आवडते.तो तिच्यासाठी शेतकऱ्याकडे मागणी घालतो.शेतकरी म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही.पण एक अट आहे माझ्याकडे ३ बैल आहेत.त्यापैकी एकाची जरी शेपटी तू पकडून दाखवली,तर मी तुझं लग्न माझ्या मुलीशी लावून देईल.ठरल्याप्रमाणे शेतकरी ३ बैल मुलासमोर आणतो.बैल खूप धिप्पाड असतात.पहिला बैल त्याच्यासमोर यायला लागतो तर त्याला पाहून हा घामेघूम होतो आणि मनात ठरवतो.कि याला जाऊद्या पुढचा बैल आला कि त्याची शेपटी पकडून दाखवू.दुसरा बैल आल्यावरही तो घाबरला आणि माघे सरकला.आता त्याच्याजवळ एकच संधी होती.तिसरा बैल आला तो शांत वाटत होता.त्याला वाटला आता तो जिंकेल याच संधीची नात आपण वाट पाहत होतो.बैल जवळ आल्यावर तो शेपटी पकडायला पुढे झाला तर काय?त्याला शेपूटच नव्हती.मग तो पश्चाताप करत बसला अरे अरे २ संधी मला आधी भेटत होत्या.मी उगाच पुढच्या संधीची वाट पहिली.थोडक्यात काय तर संधीची वाट पाहत बसल कि हुकत असते. गोष्ट छोटी होती पण सुंदर होती आणि प्रभावी होती.आपणही बऱ्याचदा असच करतो.हे गोष्टा एकूण मी सेमिनारच्या शेवटी आनंदाने बाहेर पडली.आणि पुन्हा एकदा जोमाने स्वप्नांचे दुनियेत शिरली,कि जी लवकरच सत्यात उतरतील.

Pages